शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:06 IST

- डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पिंपरी : छातीत तीव्र वेदना होत असलेल्या तरुणावर हृदयविकाराची शंका असूनही ॲसिडिटीवर उपचार करून घरी पाठवण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औंध जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. १८) पहाटे घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ममतानगर, जुनी सांगवी येथील सुमित श्रीकांत गद्रे सोनावणे ( वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तक्रारीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सुमितच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्याला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन कक्षातील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याची ‘ईसीजी’तपासणी केली. मात्र, अहवाल सामान्य असल्याचे सांगत हृदयविकाराची शक्यता नाकारण्यात आली.

डॉक्टरांनी छातीतल्या वेदनांना पित्ताचा त्रास असल्याचे निदान करत ॲसिडिटीची गोळी, मळमळ व चक्कर थांबवणारे, तसेच वेदनाशामक इंजेक्शन देऊन काही वेळातच सुमितला घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. नातेवाइकांनी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सांगवी पोलिसांनी तक्रार दाखल करून ससून रुग्णालयातील तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात हृदयरोग उपचारांची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी केला आहे.

याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक   

हृदयविकारतज्ज्ञ केवळ नावालाच आहेत. रुग्णाला तत्काळ सुसज्ज रुग्णालयात किंवा ससून येथे पाठवले असते, तर सुमितचा जीव वाचू शकला असता. - शरत शेट्टी, आरोग्य कार्यकर्ते 

सुमितवर वेळेत आणि योग्य उपचार झाले असते, तर तो आज जिवंत असता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला.  - विवेक गद्रे, सुमितचा भाऊ

English
हिंदी सारांश
Web Title : Man dies after acidity treatment; negligence alleged at hospital.

Web Summary : A 30-year-old man died after allegedly being misdiagnosed with acidity at a Pune hospital. Family alleges negligence after he was sent home with antacids despite chest pain. An inquiry is underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या