फोन कॉलवर पत्नीशी वाद; पतीने उचलले टोकाचे पाऊल
By नारायण बडगुजर | Updated: February 10, 2026 20:18 IST2026-02-10T20:17:49+5:302026-02-10T20:18:21+5:30
- पत्नीशी फोनवरून बोलताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला.

फोन कॉलवर पत्नीशी वाद; पतीने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : फोनवरून पत्नीशी वाद झाल्यानंतर पतीने विष प्राशन केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. चिखली येथे ही घटना घडली.
प्रतिक संदीप घनवटे (वय २३, रा. चिखली) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक यांची पत्नी गुजरात येथे होती. त्यांची नेहमीच भांडणे होत असे.
दरम्यान, पत्नी आणि त्याचे बोलणे झाल्यानुसार तो पत्नीला आणण्यासाठी गुजरातला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पत्नीशी फोनवरून बोलताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी प्रतिक याने विष प्राशन केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) त्याचा मृत्यू झाला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.