पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याचा जाब विचारत तिघांनी व्यापाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (३ मार्च) रात्री दहाच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी राजबहादूर रामदास यादव (वय ४५, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्निल चंदनशिवे (वय २१, पिंपरी), ललितेश पिंगळे आणि अनिश पिंगळे (दोघेही रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, स्वप्निल चंदनशिवे याला अटक केली आहे.
फिर्यादी घरी जेवण करत असताना संशयितांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. फिर्यादी बाहेर आले असता संशयितांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्याचा राग धरून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी एकाने हाताने मारहाण केली, तर इतर दोन संशयितांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कपाळावर आणि नाकावर मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
Web Summary : Pimpri: Three individuals attacked a merchant with iron rods for filing a police complaint, threatening his life. One accused, Swapnil Chandanshive, has been arrested by Pimpri police. The victim, Rajbahadur Yadav, suffered serious head and nose injuries.
Web Summary : पिंपरी: पुलिस शिकायत दर्ज कराने पर तीन लोगों ने एक व्यापारी पर लोहे की रॉड से हमला किया और जान से मारने की धमकी दी। पिंपरी पुलिस ने एक आरोपी स्वप्निल चंदनशिवे को गिरफ्तार किया है। पीड़ित राजबहादुर यादव को सिर और नाक पर गंभीर चोटें आई हैं।