राष्ट्रवादीला प्रभाग अध्यक्षपदापासूनही वंचित ठेवण्याची खेळी

By विश्वास मोरे | Updated: February 13, 2026 13:13 IST2026-02-13T13:12:58+5:302026-02-13T13:13:58+5:30

- क्षेत्रीय कार्यालयाची पुनर्रचना : आठऐवजी एकूण १० क्षेत्रीय कार्यालये

pimpari-chinchwad Attempt to deprive NCP of the post of ward president | राष्ट्रवादीला प्रभाग अध्यक्षपदापासूनही वंचित ठेवण्याची खेळी

राष्ट्रवादीला प्रभाग अध्यक्षपदापासूनही वंचित ठेवण्याची खेळी

पिंपरी : महापालिकेत भाजपची सत्ता आली असून, सध्याच्या रचनेनुसार ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे विरोधी राष्ट्रवादीला प्रभाग अध्यक्षपद मिळू नये यासाठी भाजपने खेळी खेळली आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली जाणार आहे. आता आठऐवजी एकूण १० क्षेत्रीय कार्यालये असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पूर्वी क्षेत्रीय कार्यालयाची संख्या सहा होती. महापालिकेत भाजपची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर भाजपला ७७ आणि राष्ट्रवादीला ३६ जागा मिळाल्या होत्या. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व होते. त्यावेळीही विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला साधे प्रभाग अध्यक्षपदही मिळू नये, यासाठी भाजपचे तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी खेळी खेळून सहा प्रभागांचे आठ प्रभाग केले.

आता भाजपला ८४ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)ला ३७ जागा, शिंदेसेनेला ६ जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि भाजपची युती नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिक आहेत. त्यामुळे या दोन क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. मात्र, आता तसे होऊ न देण्याची खेळी खेळली जात आहे.

-----

आता काय होणार?

महापालिकेत स्वीकृत सदस्यांची संख्या वाढण्याबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढणार आहे. सध्या आठ प्रभाग असून नवीन रचनेनुसार १० प्रभाग असणार आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला फायदा मिळू नये, यासाठी क्षेत्रीय कार्यालये फोडण्यात आली आहेत.

-------

अ क्षेत्रीय कार्यालय : १३, १४, १५

ब क्षेत्रीय कार्यालय : १७, १८, १९

क क्षेत्रीय कार्यालय : २, ९, १०

ड क्षेत्रीय कार्यालय : २१, २७, २८, २९

इ क्षेत्रीय कार्यालय ३, ४, ५

फ क्षेत्रीय कार्यालय : १, ११, १२

ग क्षेत्रीय कार्यालय : २२, २३, २४

ह क्षेत्रीय कार्यालय : ३०, ३१, ३२

ई क्षेत्रीय कार्यालय : ६, ७, ८, २०

ज क्षेत्रीय कार्यालय : १६, २५, २६

 

Web Title : वार्ड अध्यक्ष पद से NCP को हटाने की BJP की रणनीति

Web Summary : एनसीपी को वार्ड अध्यक्ष पद हासिल करने से रोकने के लिए, बीजेपी पिंपरी-चिंचवड में क्षेत्रीय कार्यालयों को पुनर्गठित कर रही है, उन्हें आठ से दस तक बढ़ा रही है। इस कदम का उद्देश्य 'जी' और 'एच' क्षेत्रीय कार्यालयों में एनसीपी के प्रभाव को कम करना है, जहां उनके पास बहुमत है।

Web Title : BJP's Strategy to Oust NCP from Ward President Post

Web Summary : To prevent NCP from gaining ward president positions, BJP is reorganizing regional offices in Pimpri-Chinchwad, increasing them from eight to ten. This move aims to dilute NCP's influence in 'G' and 'H' regional offices, where they hold a majority.