शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: मतदान सुरू होताच जळगाव येथे गोंधळ; गणेश नाईकांना केंद्र सापडेना
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्णयाने मार्ग रिकामा होताच उद्योगनगरीतील राजकीय तापमानामध्ये वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:02 IST

महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग; सर्व पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली; पक्ष कार्यालयांपासून प्रभागातील कार्यालयापर्यंत सर्वच स्तरांवर बैठकांची लगबग

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग रिकामा करताच निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शहरातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला असून, पक्ष कार्यालयांपासून प्रभागातील कार्यालयांपर्यंत सर्वच स्तरांवर बैठकांची लगबग सुरू झाली आहे.

निवडणुकीची चाहूल लागताच संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, प्रभागनिहाय गणिते, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि पॅनलच्या आखणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. गेली तीन वर्षे महापालिकेत प्रशासकराज होते. त्यामुळे महापालिका निवडणुका विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. आता न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग रिकामा होताच शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मतदार याद्या आणि मनुष्यबळाची चाचपणी

कार्यकर्त्यांनी घराघरांत संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, सोशल मीडियावरही प्रचार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये अंतर्गत गटबाजीचे संकेत, तर काही ठिकाणी नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाकडून निवडणूक यंत्रणा सज्ज करण्याचे काम सुरू आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्या, मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळाची चाचपणी आणि शिस्तबद्ध नियोजनाला गती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होताच प्रक्रिया तातडीने सुरू होईल, अशी चिन्हे आहेत. 

आमची सर्वेक्षणापासून सगळी तयारी झाली आहे. उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आहे. स्वबळावर लढायचे की युतीत, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील होईल.  - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप 

पिंपरी-चिंचवड शहरात बहुतांश प्रभागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीला समाधानकारक जागा मिळाल्या तर एकत्र लढू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

भाजपला विरोधी पक्ष संपवायचा आहे, अशी स्थिती आहे. मात्र, काँग्रेस आणि आघाडीतील सर्व पक्ष ताकदीने उतरणार आहेत. त्याबाबत बैठकाही झाल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.  - कैलास कदम, शहराध्यक्ष, काँग्रेस 

आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशाने आम्ही मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र किंवा महाविकास आघाडीसोबत लढायचे हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे.  - तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 

शिवसेना, मनसे आणि महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणुकीत सामोरे जाणार आहोत. तसेच जागावाटपाबाबतही बैठका सुरू आहेत. आमच्या पक्षाकडून तयारी सुरू केली आहे. - संजोग वाघेरे-पाटील, शहरप्रमुख, उद्धवसेना

शिवसेना महायुतीतच लढणार आहे. जागावाटपाबाबत खासदार श्रीरंग बारणे हेच निर्णय घेणार आहेत. तसेच उमेदवारांचीही तयारी पूर्ण झाली आहे. सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. - राजेश वाबळे, शहरप्रमुख, शिंदेसेना

शहरातील १२८ जागांवर ‘आप’चे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यांतील १५ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवातही झाली आहे. -  रविराज काळे, शहराध्यक्ष, आप 

आम्ही महायुतीचे महत्त्वाचे घटक आहोत. शहरातील पंधरा जागांवर उमेदवार उतरविण्याची तयारी आहे. १५ जागांवर सक्षम उमेदवार तयार आहेत. त्या जागांसाठीच पक्ष आग्रही आहे. - कुणाल वाव्हळकर, शहराध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

English
हिंदी सारांश
Web Title : Political temperature rises in Pimpri-Chinchwad as court clears way for elections.

Web Summary : Pimpri-Chinchwad's political scene heats up as the court paves way for municipal elections. Parties gear up, strategizing for upcoming polls after three years of administrator rule. Focus is on voter lists, manpower, and potential alliances as various parties prepare to contest.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५