शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

वडगाव मावळ येथे विचित्र अपघात; पीएमपी बस, कार, डंपरची धडकेत डंपरचालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:15 IST

हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.

वडगाव मावळ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात पीएमपीची बस, कार व डंपर यांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने धडकली. त्यात डंपरचालक जखमी झाला असून, डंपरची ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस (क्र. एमएच- १४, एचयू- ६२९३), डंपर (क्र. एमएच- १४, एचजी- ६६७७) आणि कार (क्र. एमएच- १२, एसई- ९८२४) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही तिन्ही वाहने मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात होती. मातोश्री हॉस्पिटलजवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी कार आणि तिच्या पाठीमागून येणारा डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर कार आणि बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले. डंपर ब्रेक लावल्यानंतर उलटला. यात खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली.गतवर्षीच्या अपघाताची पुनरावृत्तीगतवर्षी याच ठिकाणी ‘पीएमपी’च्या बसला वाचवताना कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात घुसला होता. त्या अपघातात एक महिला ठार झाली होती. तर तीनजण जखमी झाले होते. अपघातानंतर या चौकात वडगावकर नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ‘आयआरबी’च्या अधिकाऱ्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता करण्यात आलेली नाही, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस