..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता

By नारायण बडगुजर | Updated: May 21, 2025 20:46 IST2025-05-21T20:44:11+5:302025-05-21T20:46:31+5:30

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ ‘बडा अस्पताल’ एवढेच सांगितले.

pimpari-chinchwad A lost toddler rests in his mother arms Talegaon MIDC police on alert | ..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता

..अन् हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत;तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कार्यतत्परता

 पिंपरी : तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरी येथे हरवलेला आठ वर्षीय मुलगा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अवघ्या काही तासात त्याच्या पालकांच्या कुशीत विसावला. त्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आणि त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

भरत भगवान घोसले (८, रा. तळेगाव) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना इंदोरी बायपास येथे आठ वर्षीय मुलगा आढळला. तो त्याच्या पालकांना शोधत होता. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याला पुरेशी माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ ‘बडा अस्पताल’ एवढेच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटल परिसरात त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, एक दांपत्य त्यांच्या हरवलेल्या मुलाला शोधत आहे. पोलिसांनी संबंधित दांपत्याशी संपर्क केला. आपली आई रीना भगवान घोसले दिसताच मुलगा भरत हा आईच्या कुशीत विसावला. साहब आपके हम शुक्रगुजार है, आपने मुझे मेरे बेटेसे मिला दिया, असे म्हणत रिना घोसले यांनी पोलिसांचे आभार मानले.

 पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे मुलगा अवघ्या काही तासात त्याच्या आईकडे सुखरूपपणे पोहोचला. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रकाश राजगुरू, चंद्रकांत धराडे आणि जयदीप कोठावळे यांनी ही कार्यतत्परता दाखवली. त्याबद्दल तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे.

Web Title: pimpari-chinchwad A lost toddler rests in his mother arms Talegaon MIDC police on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.