शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : २० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा;थकबाकीदारांनी घेतला अभय योजनेचा लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:55 IST

आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे.

पिंपरी : महापालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम तब्बल ८० कोटींहून अधिक आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.

या योजनेंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक आहे.अभय योजना लागू झाल्यापासून १ मार्च ते २० मार्च २०२६ या २० दिवसांच्या काळात तब्बल २७ हजार ८४० मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत ८० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदारांना १९ कोटी १५ लाखांची सवलत दिली आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे.

मालमत्ता कर वसुली मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले आहे, तसेच काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नसून, अशा मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’चा लाभ घेऊन ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत मालमत्ता कर भरून विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Collects Property Tax; Delinquents Benefit from Amnesty Scheme

Web Summary : Pimpri-Chinchwad collected over ₹80 crore in 20 days via its amnesty scheme, benefiting 27,840 property tax defaulters with 90% late fee waivers. Residents are urged to utilize the scheme before March 2026.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड