शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट; अर्धी बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 2:21 PM

पिंपळे गुरव बस स्थानकावरून ११  नंबर पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड ही बस वेळेनुसार साडे दहा वाजता प्रवाशी घेऊन निघाली. बसमध्ये सकाळी सकाळी अनेक चाकरमानी, शाळकरी मुले, प्रवाशी असे एकूण ६५ प्रवाशी बसमध्ये प्रवास करीत होते

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथून दापोडीला जोडणाऱ्या पुलावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सीएनजी असलेल्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतला. यावेळी बस मध्ये ६५ प्रवाशी असल्याचे बस वाहक यांनी सांगितले. बस चालक यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीएमपीएल बस ही पिंपळे गुरव बस स्थानकावरून खडकी बाजार मार्गे मार्केट यार्ड या दिशेने जाण्यास निघाली होती. यावेळी बसची पुढील अर्धी बाजू संपूर्ण जळून खाक झाली होती. 

पिंपळे गुरव बस स्थानकावरून ११  नंबर पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड ही बस वेळेनुसार साडे दहा वाजता प्रवाशी घेऊन निघाली. बसमध्ये सकाळी सकाळी अनेक चाकरमानी, शाळकरी मुले, प्रवाशी असे एकूण ६५ प्रवाशी बसमध्ये प्रवास करीत होते. यावेळी बस चालक लक्ष्मण हजारे तसेच बस वाहक मारुती गायकवाड हे बस क्र. एम एच १२ एच बी १४३८ ही बस घेऊन मार्केट यार्ड दिशेने प्रवाशी घेऊन निघाली होती. त्रिमूर्ती चौकातून पुढे जात असताना पुलावर अचानक बस बंद पडली. यावेळी केबिनमधील बस ड्रायव्हरने बसच्या गेअर बॉक्स कडे पाहिले असता त्यातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी बस चालक, वाहक यांनी प्रसंगावधान समजून घेत त्वरित प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. अवघ्या पाच मिनिटात बस मधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेरील हवेत पसरत असताना दिसून आले. यानंतर दहा मिनिटाच्या आत बसच्या पुढील बाजूने पेट घेण्यास सुरुवात झाली. बस पेट घेत असतानाच रहाटणी, पिंपरी येथील अग्निशामक दलाची वाहने दाखल झाली. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली.

अर्ध्या तासानंतर अर्धी बस तसेच बस मधील केबिन संपूर्ण जळून खाक झाली होती. स्थानिक स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हंसराज गोरे, रविंद्र पाटील यांनी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करून नागरिकांना घटनास्थळी न येण्यास प्रयत्न केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. 

पीएमपीएलच्या केबिन मधील मेन स्वीचजळत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गाडी बंद पडली होती. धूर येत असल्याने मी सर्वांना बस मधून त्वरित उतरण्यास सांगितले. सर्व जण भयभीत होऊन त्वरित उतरून पळत सुटले. बस मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात धूर पसरला त्यामुळे आम्ही सर्व जण बस पासून लांब उभे राहिलो.         लक्ष्मण हजारे, बस ड्रायव्हर

टॅग्स :Puneपुणेpimpale saudagarपिंपळे सौदागरpimpale guravपिंपळेगुरवdapodiदापोडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड