लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 20:00 IST2018-11-02T20:00:01+5:302018-11-02T20:00:47+5:30

लग्नामध्ये व्यवस्थित मानपान दिला नाही तसेच चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

physical teasing of married women due to doubt of character | लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ 

लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ 

पिंपरी : लग्नामध्ये व्यवस्थित मानपान दिला नाही तसेच चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          पती समीर रमेश मेंढे (रा. संजिवनी अपार्टमेंट दगडू पाटीलनगर, वेंगसरकर स्टेडियमजवळ, थेरगाव) याच्यासह सासू शशिकला व दीर तुषार (रा. काळू अपार्टमेंट, संतोषनगर कल्याण ईस्ट, ठाणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना विवाहितेच्या वडीलांनी लग्नामध्ये व्यवस्थित मानपान व वस्तू दिल्या नाही या कारणावरुन तसेच चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत विवाहितेने तक्रार दिल्यानंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: physical teasing of married women due to doubt of character