विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसांना दमदाटी; आळंदीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:07 IST2021-03-30T01:05:38+5:302021-03-30T01:07:00+5:30

आळंदी येथे नगरपरिषद चौक येथे हॉटेल सम्राटच्या समोर शनिवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.  

Person threating to police who not wearing mask; incidents in Alandi | विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसांना दमदाटी; आळंदीतील घटना

विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसांना दमदाटी; आळंदीतील घटना

पिंपरी : हॉटेलच्या विनामास्क असलेल्या कामगारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच पोलिसाच्या अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. आळंदी येथे नगरपरिषद चौक येथे हॉटेल सम्राटच्या समोर शनिवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.  

राहुल सुरेश चोरडिया (रा. काळेवाडी, देहूफाटा, ता. हवेली), असे आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी जालिंदर जाधव यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २७) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या हॉटेलमधील विनामास्क असलेल्या कामगारावर दंडात्मक कारवाई करून त्याची पावती पोलिसांनी दिली. त्या कारणावरून आरोपीने अरेरावी केली. त्यामुळे त्याला समजावून सांगून पोलीस हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी आरोपी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आला. तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये कसे काय आले, मी एक पत्रकार असून नगरसेवक आहे, असे आरोपी पोलिसांना मोठ्या आवाजात म्हणाला. तसेच दंडाची पावती पोलिसांच्या अंगावर फेकून दिली. त्यानंतर फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करून आरोपीने सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Person threating to police who not wearing mask; incidents in Alandi