सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By प्रकाश गायकर | Updated: December 29, 2023 18:42 IST2023-12-29T18:41:08+5:302023-12-29T18:42:07+5:30

टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अनिकेत गंगाधर पुंडगे (वय २३, रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे....

Pedestrian killed in collision with travel while crossing road at Somatne Phata | सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : सोमाटणे फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादच्याऱ्याचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री घडली. अंकुश रामू फाले (वय ३४, रा.मुळशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजू तुकाराम जाधव (वय ३९, रा.सोमाटणे फाटा) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अनिकेत गंगाधर पुंडगे (वय २३, रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचा मेहुणा अंकुश हे सोमाटणे फाटा येथे पायी रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हल्स ही वेगाने चालवून अंकुश याला जोरदार धडक दिली. यामध्ये अंकुश गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Pedestrian killed in collision with travel while crossing road at Somatne Phata