PCMC Mayor: पिंपरी चिंचवडच्या महापौर निवडीवर भाजप कार्यकारिणीत चर्चा; ८ नावांचा बंद लिफाफा पक्षश्रेष्ठींकडे जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:41 IST2026-01-31T12:41:04+5:302026-01-31T12:41:23+5:30
PCMC Mayor महापालिकेतील सत्तासूत्रे हाती घेताना संघटनात्मक समतोल आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनांचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार

PCMC Mayor: पिंपरी चिंचवडच्या महापौर निवडीवर भाजप कार्यकारिणीत चर्चा; ८ नावांचा बंद लिफाफा पक्षश्रेष्ठींकडे जाणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्यकारिणीची बैठक कासारवाडी येथे झाली. तीत महापौर निवडीसह महापालिकेतील आगामी सत्तास्थापनेच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणाऱ्या यादीसाठी सर्व भाजप नगरसेवकांच्या सह्या घेण्यात आल्या. महापौरपदासाठी इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार असून, ही नावे बंद लिफाफ्यात देण्यात येणार असल्याची चर्चा बैठकीत झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बंद लिफाफ्यात भाजपच्या आठ नगरसेवकांची नावे आहेत. पक्षश्रेष्ठींकडून या नावांवर अंतिम निर्णय झाल्यानंतर महापौरपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. महापौरपदाचा निर्णय झाल्यानंतर सत्ताधारी पक्षनेता, तसेच स्थायी समिती अध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेतील सत्तासूत्रे हाती घेताना संघटनात्मक समतोल आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनांचा विचार करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.