पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत ४४३ जणांनी माघार घेतल्यामुळे ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार लढत आहेत. यंदा भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीतच मुख्य सामना होणार असून, भाजपने दोन जागा बिनविरोध करून खाते खोलले आहे.
महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. शहरात महायुती तुटली असून आणि महाविकास आघाडीही फुटली आहे. मागील सत्ताधारी भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुती असताना पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना स्वबळावर उतरले आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिले असून, उद्धवसेना-मनसे-रासप एकत्र लढत आहेत. शिवाय आप, वंचित बहुजन आघाडीसह अपक्षही मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत. युती-आघाडीचा घोळ शेवटपर्यंत राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून एबी फॉर्मचा गोंधळ सुरू होता. बंडखोरी रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने अर्ज भरल्यानंतरही उमेदवारी याद्या जाहीर केल्या नव्हत्या. त्या छाननीनंतर जाहीर करण्यात आल्या. काही जागा बिनविरोध करण्यासाठी भाजपने अर्ज माघारीपर्यंत प्रयत्न केले. राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव होता. शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेसकडेही नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी अर्ज माघार घेण्याची नामुष्की ओढवली.
भाजपने १२३ उमेदवार दिले असून एबी फॉर्म बाद झाल्याने त्यापैकी ३ पुरस्कृत केले आहेत. आरपीआयला पाच जागा सोडल्या असल्या तरी ते ‘कमळ’ चिन्हावर लढणार आहेत. काँग्रेसने ५९ जण उतरविले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाले. तीन जणांनी माघार घेतली आहे. शिंदेसेनेने ६९ उमेदवार दिले, तर एबी फॉर्म बाद झाल्याने चार जागा पुरस्कृत केल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीने १२५ उमेदवार दिले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाले. तीन जणांनी माघार घेतली. आता १२० जागांवर दोन्ही पक्ष लढत आहेत.
२०१७ मधील पक्षीय बलाबल
एकूण जागा १२८
भाजप ७७राष्ट्रवादी ३६शिवसेना ९मनसे १अपक्ष ५
रिंगणातील पक्षनिहाय उमेदवार
भाजप १२३ (पैकी ३ पुरस्कृत), आरपीआय ५ : एकूण १२८राष्ट्रवादी (अजित पवार) : १०२राष्ट्रवादी (शरद पवार) : १८काँग्रेस : ५४शिंदेसेना : ६९ (आणखी चार जागा पुरस्कृत)उद्धवसेना : ५८मनसे : १५आप : ३
Web Summary : Pimpri-Chinchwad's upcoming election sees broken alliances. BJP and NCP factions are set for a major contest. BJP already secured two seats unopposed. Congress, Shiv Sena, and others also field candidates.
Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनाव में गठबंधन टूटने से बीजेपी और एनसीपी गुटों के बीच मुकाबला होगा। बीजेपी ने पहले ही दो सीटें निर्विरोध जीतीं। कांग्रेस, शिवसेना और अन्य भी मैदान में हैं।