PCMC| महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग, बांधकामासाठी पाच कंपन्या सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:53 AM2022-08-24T08:53:11+5:302022-08-24T08:55:07+5:30

सायन्स पार्कसमोर जागा निश्चित...

PCMC As soon as the new building of the Municipal Corporation was built, five companies started for construction | PCMC| महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग, बांधकामासाठी पाच कंपन्या सरसावल्या

PCMC| महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग, बांधकामासाठी पाच कंपन्या सरसावल्या

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३१२ कोटी रुपये खर्च होणार आहे. चिंचवड येथील सायन्स पार्क समोरील मोकळ्या जागेत १८ मजली पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, एक ते दीड महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाल्याने महापालिकेची नवीन इमारत बांधण्याची लगबग सुरू झाली.

महापालिकेची पुणे - मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरी येथे चार मजली मुख्य इमारत आहे. इमारतीस ३५ वर्षे झाली आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन १९८१च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख ४९ हजार ३६४ होती. आता ती २७ लाखांच्या पुढे गेली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा महापालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी ताण पडत आहे. तसेच, महापालिका इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने अनेक विभागांची कार्यालये इतर ठिकाणी आहेत. महापालिकेची एकाच ठिकाणी सुसज्ज इमारत असावी, म्हणून सायन्स पार्कसमोर जागा निश्चित झाली आहे.

त्या कामाची निविदा प्रशासकीय राजवटीत काढली आहे. अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., बी. जी. शिर्के कॅन्स्ट्रक्शन टेक्नॉलाजी प्रा. लि., केएमव्ही प्रोजेक्टस लिमिटेड, केपीसी प्रोजेक्टस लिमिटेड आणि रामा सिव्हील इंडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदेची पुढील प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पात्र ठरणाऱ्या ठेकेदार कंपनीस काम दिले जाईल. त्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

Web Title: PCMC As soon as the new building of the Municipal Corporation was built, five companies started for construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.