आमदार अश्विनी जगतापांचा अवमान करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:45 PM2023-10-12T13:45:44+5:302023-10-12T13:46:56+5:30

पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खुर्ची एका बाजूला ठेवली होती...

Party should take action against those who insult MLA Ashwini Jagtap, BJP office-bearer demands | आमदार अश्विनी जगतापांचा अवमान करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

आमदार अश्विनी जगतापांचा अवमान करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील अनेकांना उंचीपेक्षा अधिक दिले. नि:स्वार्थीपणे कित्येक रंकांचा राव केला. त्या परिसाने त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच केले. मात्र, या सर्वाचा काहींना विस्मय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खुर्ची एका बाजूला ठेवली होती. पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके यांनी हेतुपुरस्सर जाणूनबुजून हा प्रकार केल्यानेच आमदार जगताप यांनी नामदेव ढाके यांचा समाचार घेतला. त्यामुळे असे बालिश चाळे करून पक्षात फूट पाडण्याचा व अंतर्गत कलह माजवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी वाकडकर यांनी केली आहे.

Web Title: Party should take action against those who insult MLA Ashwini Jagtap, BJP office-bearer demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.