शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा ‘मॅरेथॉन’मध्ये पार्थ पवार यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 03:01 IST

पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

लोणावळा : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोणावळा मॅरेथॉनला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावली. पार्थ यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.पार्थ पवार लोणावळ्यात येणार असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे झेंडे, स्वागत कमानी व स्वागताचे बोर्ड लावत शहर राष्ट्रवादीमय करण्यात आले होते. पार्थ यांच्या हस्ते भाजी मार्केट चौकात मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, पालक असे हजारच्या जवळपास नागरिक सहभागी झाले होते. भाजी मार्केट चौक ते भांगरवाडी, पंडित नेहरू मार्ग, सिद्धार्थनगर, मावळा पुतळा चौक, जयचंद चौक मार्गे पुन्हा भाजी मार्केट चौक अशी ही मॅरेथॉन झाली.राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, लोणावळा शहर महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितीन शहा, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, राजू बोराटी, रवी पोटफोडे, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड, राजेश मेहता, कुमार धायगुडे, अमोल गायकवाड, मनोज लऊळकर, दत्तात्रय गोसावी, संतोष कचरे, शीला बनकर, वकील सेलचे अध्यक्ष शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारlonavalaलोणावळा