Pimpri Chinchwad: घरात दडवून ठेवला होता साडेअकरा लाखांचा पानमसाला; एक पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 13:02 IST2024-01-26T13:02:14+5:302024-01-26T13:02:22+5:30
देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली....

Pimpri Chinchwad: घरात दडवून ठेवला होता साडेअकरा लाखांचा पानमसाला; एक पकडला
पिंपरी : विक्रीसाठी घरात साठवलेला ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली. देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
रियाज अजीज शेख (४५, रा. मेन बाजार, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २४) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज याने विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला साठवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा (पानमसाला) साठा जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.