Pimpri Chinchwad: रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने उडविले, तरुणाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: March 19, 2024 18:01 IST2024-03-19T18:00:54+5:302024-03-19T18:01:39+5:30
सातारा-मुंबई मार्गिकेवरील राधा चौकात सोमवारी (दि. १८) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

Pimpri Chinchwad: रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने उडविले, तरुणाचा मृत्यू
पिंपरी : रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे मुंबई -बंगळुरू महामार्गाच्या सातारा-मुंबई मार्गिकेवरील राधा चौकात सोमवारी (दि. १८) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
कपिल संजय गायकवाड (३१, रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कुसाबा गायकवाड (६०, रा. जालना) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांचा मुलगा कपिल गायकवाड हा महाळुंगे येथे राधा चौकात रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव आलेल्या कंटेनरने कपिल यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कपिल यांचा मृत्यू झाला.