पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहीतेला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 12:55 IST2020-03-01T12:51:31+5:302020-03-01T12:55:11+5:30

पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना वाकड येथे घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासू यांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे.

oppose to husband's extra marital affair ; women harassed by husband rsg | पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहीतेला मारहाण

पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहीतेला मारहाण

पिंपरी :  पतीचे एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना वाकड येथे घडली.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती अपूर्व राजेश श्रोत्री (वय ४१), सासू लता राजेश श्रोत्री (वय ६०, दोघे रा. शंकर कलाटे नगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३६ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  हा प्रकार ३० जून २०१० ते २८ पेष्ठब्रुवारी २०२० या कालावधीत घडला.  पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संबंधास फिर्यादीने विरोध केला. या कारणावरून पतीने विवाहितेला मारहाण केली. याबाबत विवाहितेने सासूला हा प्रकार सांगितला असता सासूने देखील वारंवार शिवीगाळ करून विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केला.

Web Title: oppose to husband's extra marital affair ; women harassed by husband rsg