शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:18 IST

साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला.

ठळक मुद्देसासरच्या मंडळींकडून छळ : टोमण्यांमुळे विवाहितेने भोसरीत संपविली जीवनयात्रा

पिंपरी : माहेराहून हुंडा आणण्यासाठी तसेच इतर कारणांवरून विवाहितेचा छळ होत असल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. पण शारीरिक जाड असल्याच्या कारणावरून एकच वेळ जेवण देऊन सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली. साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. सतत टोमणे देत एक वेळचेच जेवण दिले. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.  प्रियंका केदार पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. भोसरी येथे राहणाऱ्या प्रियंका यांचा २० डिसेंबर २०१५ ला फलटण येथील केदार श्रीकांत पेटकर याच्याशी विवाह झाला. तीन महिने आधी साखरपुडा झाला होता. पेटकर यांच्या कुटुंबातील सर्वांनी प्रियंकाला पाहिले होते. विवाहापर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीतही दोन्ही कुटुंब संपर्कात होते. दरम्यान, २० डिसेंबर २०१५ ला प्रियंका आणि केदार यांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी प्रियंका यांचा छळ करण्यास सुरुवात केली. ‘तू जाड आहेस, तब्येत कमी कर’ असे म्हणू लागले. तब्येत कमी करण्याचे कारण देत प्रियंका यांना एक वेळचेच जेवण दिले जायचे.......घटस्फोटासाठी आणला दबाव प्रियंका यांनी घटस्फोट द्यावा, यासाठीही त्यांच्यावर दबाव आणला जात होता. शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून रविवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रियंका यांनी भोसरीतील गव्हाणे वस्ती येथील घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली. घटनेत विवाहितेला दोष देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिच्यावर जीव गमाविण्याची वेळ आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. ........तिची सासरी नांदायची इच्छा होतीमाझी बहीण केवळ जाड असल्याच्या कारणावरून तिचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ केला जात होता. सासरचे मंडळी तिला वारंवार टोमणे देत. तसेच तिला सासरी नांदायची इच्छा असतानाही तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला जायचा, असे प्रियंका यांचे भाऊ पुष्कराज प्रभुणे यांनी सांगितले. 

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू