शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत येथे चुकीच्या कामामुळे एका युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 14:27 IST

जुना पुणे- मुंबई महामार्गावर पवनानगर फाटा हा अनेक वर्षांपासुन वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता.

ठळक मुद्देउड्डाणपुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून या कामाची चार वेळा मुदत संपूनही काम अपूर्ण

कामशेत : जुना पुणे- मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या व कामाच्या चार मुदत संपूनही पूर्ण होत नसलेल्या भरवाच्या उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. त्यात दोन ठिकाणी रस्ता दुभाजला आहे. याठिकाणी डायव्हर्जनचे कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावण्यात आले नसल्याने वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालक युवकाचा रस्ता समजुन न आल्याने खड्यात पडुन मृत्यु झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ( दि.७) रोजी जुना पुणे मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे मुंबई पुणे लेनवर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून ( क्र. एम एच ४७ ए इ २८५९) जाणारा विवेक विलास सुवारे ( वय २५ रा. गोरेगाव, मुंबई) हा युवक पुढील रस्ता न समजल्याने मातीच्या ढिगाऱ्यातुन सुमारे २०० फुट दुचाकी फरफटत जाऊन खड्यात पडुन अपघात झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला असुन याची माहिती सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या माणसांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.

   जुना पुणे- मुंबई महामार्गावर पवनानगर फाटा हा अनेक वर्षांपासुन वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. येथील उड्डाणपुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून या कामाची मुदत चार वेळा संपूनही काम पूर्ण झाले नाही. शिवाय दोन भागात मुख्य रस्ता दुभाजुन सेवा रस्त्यावर वाहतुक वळवण्यात आली आहे. मागील महिन्यात असाच एक अपघात झाला असुन आत्तापर्यंत येथेच सुमारे दहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत. मात्र येथे सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आले नसल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने वारंवार येथे अपघात घडून अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत.        

 

टॅग्स :kamshetकामशेतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघात