शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 6:08 PM

शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली.

चाकण  - शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज ( दि. १७ ) रात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नासिक महामार्गावर वाकी खुर्द ( ता.खेड ) गावच्या हद्दीत काळोबा मंदिराजवळ झाला. सातारा जिल्ह्यातील हे युवक सोमवारी टेम्पो व दुचाकीवरून शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरीला गेले होते. शिवनेरीहुन परतताना रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात स्वप्नील अरविंद चव्हाण ( वय २४,रा पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) हा युवक मयत झाला. तर अमर चंद्रकांत पाचपुते (वय २४), विनायक रामचंद्र गोळे (वय २६ दोघेही रा. पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच तिघांनाही रुग्णालयात नेले असता स्वप्नील चव्हाण हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तरुण काळोबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला मशालीवर तेल ओतण्यासाठी थांबले असता नासिक बाजूकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार ठोस देऊन अपघात केला. अपघातानंतर वाहन चालक टेम्पोसह फरार झाला. मंगळवारी पाचपुतेवाडी येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंडळाचे काही कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवड येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो याठिकाणी आपल्या बहिणीसोबत राहत होता. सागर तानाजी पाचपुते ( वय ३०, रा. पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८१/२०१८, भादंवि कलम २७९, ३३८, ३३७, ३०४ (२), ४२७, मोटार वाहन कलम १८४, १३४/१७७ नुसार टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपस करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSatara areaसातारा परिसर