थेरगाव येथे बेकायदा गावठी कट्ट्यासह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:50 IST2018-08-24T17:48:58+5:302018-08-24T17:50:43+5:30
बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा जवळ बाळगणाऱ्या एकाला वाकड पोलिसांनी थेरगाव येथे अटक केली.

थेरगाव येथे बेकायदा गावठी कट्ट्यासह एकाला अटक
ठळक मुद्देगावठी बनावटीचा १५ हजार रुपये किमतीचा कट्टाही जप्त
पिंपरी-चिंचवड (वाकड) : बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा जवळ बाळगणाऱ्या एकाला वाकड पोलिसांनी थेरगाव येथील पुणेरी स्वीट जवळील मोकळया मैदानात रंगेहाथ पकडून गावठी कट्ट्यासह अटक केली. रेहमात बरकतअली सिद्दीकी (वय ४८, रा. थोरात चाळ, बालाजी कॉलनी थेरगाव, मुळगाव उत्तरप्रदेश) असे त्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बी.जी. कन्हेरकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून गावठी बनावटीचा १५ हजार रुपये किमतीचा कट्टाही जप्त करण्यात आला आहे.