भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुणे-मुंबई महामार्गावर अपघात

By नारायण बडगुजर | Updated: October 5, 2023 18:32 IST2023-10-05T18:32:35+5:302023-10-05T18:32:47+5:30

पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. पुणे -मुंबई महामार्गावर पुनावळे येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास ...

One killed in collision with speeding vehicle, accident on Pune-Mumbai highway | भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुणे-मुंबई महामार्गावर अपघात

भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, पुणे-मुंबई महामार्गावर अपघात

पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. पुणे -मुंबई महामार्गावर पुनावळे येथे मंगळवारी (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. भोलाराम बेल तंती (३३, रा. ताथवडे. मूळ रा. आसाम) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिकी उदय करमोकार (२३, रा. ताथवडे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिकी करमोकार आणि त्यांचा मित्र भोलाराम हे पुणे -मुंबई महामार्गावरून जात होते. ते दोघे रस्ता ओलांडत होते. फिर्यादी बिकी यांनी रस्ता ओलांडला. मात्र त्याचवेळी त्यांच्या मित्र भोलाराम रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भोलाराम यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे तपास करीत आहेत.

Web Title: One killed in collision with speeding vehicle, accident on Pune-Mumbai highway