मोटारीला धडकून एकाचा मृत्यू, ३ जखमी; देहूरोडजवळच्या किवळेत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:41 IST2017-11-11T14:35:50+5:302017-11-11T14:41:31+5:30
किवळे गावाजवळ एका अज्ञात वाहनाला धडकून दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारीतील एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.

मोटारीला धडकून एकाचा मृत्यू, ३ जखमी; देहूरोडजवळच्या किवळेत अपघात
पिंपरी : देहूरोडच्या हद्दीत किवळे गावाजवळ एका अज्ञात वाहनाला धडकून दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारीतील एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने संजय नारायण दाऊतपुरे (रा. अमरावती) यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. भीमराव दत्तोबा म्हस्के (वय ५५), मनोज सुरेश बंडगर (वय ३०), सचिन उत्तरेश्वर साठे (वय २८, रा. सर्व काळेवाडी, पुणे) हे तिघेही गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे मोटारीने (एमएच १४, सीएक्स ९०२१) मुंबईवरून पुण्याला येत होते. देहूरोड येथे किवळे गावाजवळ त्यांच्या पुढे जाणार्या एका अज्ञात वाहनाला धडकून नंतर रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन त्यांची मोटार आदळली. या अपघातात संजय यांना तळेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर भीमराव, मनोज आणि सचिन हे तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.