ठळक मुद्देभरधाव ट्रकने मालवाहू वाहनाला दिली धडक पातूर-वाशिम मार्गावर गोंधळवाडी, माळराजुरा फाट्याजवळील गॅस गोडावूनजवळ घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर: भरधाव ट्रकने मालवाहू वाहनाला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर-वाशिम मार्गावर गोंधळवाडी, माळराजुरा फाट्याजवळील गॅस गोडावूनजवळ ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. 
मालेगाववरून बी-बियाणे व कीटकनाशकांचे बॉक्स घेऊन मालवाहू वाहन क्र. एमएच ३७ जे १७१ येत होते. दरम्यान, पातूरपासून ४ कि.मी. अंतरावरील गोंधळवाडी, माळराजुरा फाट्याजवळील गॅस गोडवूनजवळ या मालवाहू वाहनाला अज्ञात मालेगावकडून पातूरकडे बी-बियाणे व कीटकनाशकांचे बॉक्स घेऊन येत असलेल्या एमएच ३७ जे १७१ क्रमांकाच्या मालवाहकने जबर धडक दिली. यामध्ये मालवाहू वाहनाचा चालक संतोष बन्सी काळे (३२) रा. कळंबेश्‍वर, ता. मालेगाव, जि. वाशिम हा जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी अशोक उत्तमराव गज्रे रा. मालेगाव, जि. वाशिम हा किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी पातूर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.