शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

पिंपरीतील पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटावर एकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 8:35 PM

पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील बुद्ध विहारानजिकच्या विसर्जन घाटावर तरुण ...

पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील बुद्ध विहारानजिकच्या विसर्जन घाटावर तरुण गणेशमूर्ती बुडविण्यासाठी गेला होता. त्याला पोहोता येत नव्हते. तरुण बुडाल्याची दुर्घटना घडताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. महापालिकेच्या अग्निशामक विभागाला याबाबत कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान तेथे तातडीने दाखल झाले. त्यांनी छोट्या होडीच्या साह्याने नदीपात्रात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांपासून संततधार पाऊस झाला असल्याने नदीपात्र दुधडी भरून वाहत आहे. नदीपात्र भरून वाहत असताना, तरुण गाळात अडकला, की वाहून गेला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. 

गतवर्षी मामा, यंदा भाच्याचा मृत्यू गतवर्षी पिंपळे सौदागर येथील देवी आईमाता घाटावर अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशीच दुर्घटना घडली होती. त्यात शंकर लोखंडे (वय ४५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहोण्यात तरबेज असतानाही त्यांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेतील तरुण शिवाजी शिंदे हा गतवर्षी मृत्यू झालेल्या लोखंडे यांचा भाचा आहे. नात्याने मामा- भाचे असलेल्या या दोघांचा एक वर्षात अशा पद्धतीने मृत्यू झाला. याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश विसर्जनावेळी त्यामुळे विसर्जन घाटावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेने विसर्जन घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात