वाकड येथे गांजा विक्री प्रकरणी वृद्धास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:28 IST2018-08-02T13:28:26+5:302018-08-02T13:28:54+5:30
वाकड परिसरातील काळाखडक येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

वाकड येथे गांजा विक्री प्रकरणी वृद्धास अटक
पिंपरी : गांजा विक्री करत असलेल्या एका वृध्दास पोलिसांनी अटक केली. ही घटना वाकड येथे घडली. चंदु प्यारअप्पा पुजारी (वय ६०, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१आॅगस्ट) वाकड परिसरातील काळाखडक येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना त्यात चार किलो ३६५ ग्रॅम वजनाचा ६८ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने निरीक्षक सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश माने आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहे.