लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:57 IST2020-02-05T15:57:02+5:302020-02-05T15:57:29+5:30
सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल..

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा
पिंपरी : सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल करणाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. नवीन वर्षात आतापर्यंत पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
वाकड येथे १ मे २०१९ रोजी ही घटना घडली. इमनूर बीसवा या युजर आयडीच्या मोबाइल धारकाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने सोशल मीडियावर लहान मुलांचे व महिलांचे अश्लिल व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
हिंजवडी, चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.