शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

... आता तुमचे हॉटेलच सील करतो म्हणत मावळ तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 6:50 PM

हाॅटेलमध्ये कोरोना विषाणूचे पालन न करण्यात आल्याने तुमचे हाॅटेल सील करण्यात येणार आहे,असे सांगून १० हजार लुबाडले.

वडगाव मावळ : कोरोनाच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन केले नाही. आता तुमचे हाॅटेलच सील करतो असे सांगत पोलीस निरीक्षकाचा ड्रेस घालून आणि कमरेला गोळ्या नसलेले रिव्हॉल्वर लावून ते दोघे मावळ तालुक्यातील अनेक हाॅटेल व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करत होते. अखेर या तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकासह त्याच्या चालकाला वडगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. 

नवनाथ शिवाजी बोऱ्हाडे (वय २६ रा. ब्राह्मणवाडी) या हाॅटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली. याप्रकरणी जुबेर हुसेन शेख (वय ३० रा. तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे) , प्रशांत किसन गरूड (वय ३६ रा. घोरावाडी, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या तोतया पोलिसांची नावे असून न्यायालयाने १७ तारखेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.१० रोजी दुपारी बाराच्या सुमारास वडगाव हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील माणुसकी हाॅटेलमध्ये जुबेर हुसेन शेख हा अल्टोकार (एमएच १४. डीए. ५९४१ ) मधून गेला. तिथे त्याने मी नार्कोटिक विभागाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक असून तुमच्या हाॅटेलमध्ये कोरोना विषाणूचे पालन न करण्यात आल्याने हाॅटेल सील करण्यात येणार आहे, असे सांगितले. अन्यथा माझ्याकडे जी कागदपत्रांची फाईल आहे. त्यावर दहा हजार ठेवा असे म्हणाला. यानंतर हाॅटेल मालक याने त्याला दहा हजार दिले.पैसे घेऊन ते दोघेही निघून गेले. 

.................

.... आणि तोतया गजाआड.... याबाबत काही हाॅटेल मालकांनी मंगळवारी रात्री पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक दिलीप देसाई, संतोष माने, मनोज कदम, गणेश तावरे, दिपक गायकवाड, शैलेश कंटोळी यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. एकतर लाॅकडाऊन मुळे पाच महिन्यापासून हाॅटेल बंद होती.त्यामुळे हाॅटेल व्यवसायिक त्रस्त झाले होते.त्यात हाटेल सुरू झाल्यावर ही फसवूक झाली. या दोघांनी वडगाव तळेगाव एमआयडीसी परिसरातील अनेक हाॅटेल मालकांना गंडा घातला असून ज्यांची फसवणूक झाली त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे. 

.............................

साहेब मला मारू नका मीच गुन्हा केलाय... बुधवारी रात्री जुबेर शेख याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करताना तो म्हणाला मी शासकीय नोकर आहे. तर हाॅटेल मालक म्हणायचे हाच तो पैसे नेणारा. शेवटी पोलिसांनी आतल्या खोलीत घेऊन खाक्या दाखवायला सुरवात केली. त्यावर तो म्हणाला, साहेब मला मारू नका.. मीच गुन्हा केला आहे

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPoliceपोलिसhotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय