कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीची वाहतूक कोंडी नको रे बाबा..!

By विश्वास मोरे | Updated: July 30, 2025 11:48 IST2025-07-30T11:47:54+5:302025-07-30T11:48:04+5:30

- दोन मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्ध तास कोंडीचा त्रास : एकेरी मार्ग, करूनही कोंडी काही थांबेना

No more blaring horns and Hinjewadi traffic jams, Dad! | कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीची वाहतूक कोंडी नको रे बाबा..!

कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीची वाहतूक कोंडी नको रे बाबा..!

पिंपरी : विकास आराखड्यातील रस्त्यांचा न झालेला विकास, अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे, सुरू असलेले मेट्रोचे काम आणि बंद सिग्नल यंत्रणा, कोलमडलेले वाहतूक नियोजन यामुळे हिंजवडीतीलवाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिणामी दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीचा प्रवास ‘कोंडी नको रे बाबा..,’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अभियंत्यांना कामावर पोहोचण्यासाठी दुचाकीवरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या प्रश्नाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव आहे.

हिंजवडी येथील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीत येण्यासाठी प्रमुख पाच रस्ते आहेत. मुंबई-पुणे- बंगळुरु महामार्गावरून येण्यासाठी वाकड गावठाणातून तर भुमकर चौक येथून शिवाजी चौक असे दोन, तर कासारसाई येथून शिवाजी चौक आणि टप्पा तीन येथे एक रस्ता येतो. त्याचबरोबर पौडवरून टप्पा तीनकडून आणि म्हाळुंगे-माणगाव रस्त्याने हिंजवडीत येण्यासाठी रस्ता आहे. एमआयडीसीच्या बाहेरील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए, ग्रामपंचायती प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.
 
कोंडीची कारणे
सध्या हिंजवडी टप्पा तीनपासून हिंजवडी गावठाण, वाकड-बालेवाडी मार्गे पुण्याला जाण्यासाठी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी सध्या रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर वाकडमधून हिंजवडीकडे जाताना अलीकडे एक किलोमीटर महापालिका हद्दीपर्यंत रस्ता रुंद आहे. मात्र, हिंजवडी परिसरात हा रस्ता कमी रुंदीचा झाला आहे.
२) मारुंजी ते हिंजवडी, भुमकर चौक ते लक्ष्मी चौक, यशोदा गार्डन, हिंजवडी, तसेच मेझा नाईन चौक ते भुमकर चौक या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी असते. प्रमुख रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अशा प्रकारची स्थिती शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरही दिसून येते.
३) सकाळी हिंजवडीत जाताना आणि सायंकाळी हिंजवडीतून बाहेर पडताना मोठ्याप्रमाणावर कोंडी असते. हिंजवडीचा सर्व भार हा मोटारसायकल, पीएमपी बस, स्कूटर, रिक्षा, कार, टेम्पो ट्रॅव्हलर आणि बस यावरच येऊन पडत आहे.

Web Title: No more blaring horns and Hinjewadi traffic jams, Dad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.