लोकलच्या धडकेने राष्ट्रवादीच्या कार्यालयीन सचिवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:54 IST2020-01-02T16:52:57+5:302020-01-02T16:54:13+5:30
आत्महत्या की मृत्यू याबाबतचे कारण अस्पष्ट

लोकलच्या धडकेने राष्ट्रवादीच्या कार्यालयीन सचिवाचा मृत्यू
पिंपरी : लोकलच्या धडकेत पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय, रा. खराळवाडी ) यांचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या की मृत्यू याबाबतचे कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे खराळवाडी पिंपरी येथे कार्यालय आहे. त्यात मोरे हे कार्यालयीन सचिव म्हणून काम पाहत होते. सत्त्ता असताना आणि नसताना मोरे यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम केले. खराळवाडीतील कार्यालयातच मोरे राहत असतं. आज सकाळी ते काही लोकांना भेटून मी मुंबईला जात आहे, असे सांगितले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकावर लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जखमी मोरे यांना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कारणाचा शोध सुरू
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले असताना सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात असताना पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव मोरे यांच्या मृत्यू झाला आहे. मोरे यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याचा शोध पोलिस घेत आहेत.