शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:15 IST

- पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे.

- राजेश नागरे

मोशी : येथील बीआरटी मार्गावरील रस्त्यांचे चित्र पाहिले तर ‘रस्ता आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?’ असा प्रश्न नागरिकांना पडतो. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांनी कब्जा केला आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजवण्याचा दिखाऊ प्रयोग केला होता. पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना ते दिसतच नाहीत आणि अचानक वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होतात. काही ठिकाणी दुचाकीस्वार फेकले जाऊन गंभीर जखमी झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका फक्त मलमपट्टीच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे. डागडुगजीच्या नावाखाली केवळ मुरूम टाकून लाखो रुपयांचा निधी उधळला आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी सरळसरळ खेळ केला जात आहे. 

मोशीतील नागरिक खड्ड्यांना कंटाळले आहेत. रोज होणाऱ्या वाहन दुरुस्तीच्या खर्चाने नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक रस्त्यांची ही अवस्था असूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. इतकेच नव्हे, तर सोशल मीडियावर नागरिकांनी या खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून थेट पालिकेवर हल्ला चढवला आहे.

आमच्या कराच्या पैशातून जर रस्तेही व्यवस्थित मिळणार नसतील, तर पालिकेच्या अस्तित्वाचा उपयोग काय? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. यापुढे जर एखादा मोठा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी थेट महापालिकेवर असेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

बीआरटी रस्त्याच्या संदर्भात देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मी महापालिका प्रशासनाकडे करणार आहे. - वसंत बोराटे, माजी नगरसेवकबीआरटी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. त्यासाठी पालिकेकडे अनेकवेळा मागणी केली. मात्र, पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. आम्हाला खड्ड्यांची सवय झाली आहे; परंतु बाहेर गावातून येणारे प्रवासी मोशीमध्ये येताच त्यांचे खड्ड्यांनी स्वागत केले जाते. - रूपाली आल्हाट, शहराध्यक्षा, उद्धवसेनाविभागासंबंधित सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  - अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा