शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंड शमलं; नाना काटेंची माघार, चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 15:37 IST

चिंचवडमध्ये महायुतीची डोकेदुखी संपली, आगामी विधानसभेत तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होणार

पिंपरी चिंचवड: चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांचे बंड थंड झालं आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. चिंचवडमधून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली.  उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत नाना काटे यांनी अर्ज कायम ठेवले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काटे बंडखोरीवर ठाम होते. अखेर अजितदादांचा फोन झाल्यानंतर त्यांनी १ तास अगोदर माघार घेतली आहे. तसेच चिंचवड विधानसभेतून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. 

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत १ लाख ३५ हजार ४९४ मतं मिळाली होती. तर नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी ४० हजार ७५ मत मिळाली होती. त्यावेळी राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची मतं विभागली गेली असल्याची प्रतिक्रिया काटेंनी पराभवानंतर दिली होती. आताच्या विधानसभेत नाना काटेंनी बंडखोरी केली. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतु काटेंच्या अपक्ष अर्ज मागे घेतल्याने तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवडमध्ये आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chinchwad-acचिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीMLAआमदार