Murdered of person by stabbing in the neck; Incident in the Wakad | गळ्यावर वार करून एकाचा खून; वाकड येथील घटना 

गळ्यावर वार करून एकाचा खून; वाकड येथील घटना 

पिंपरी : गळ्यावर वार करून एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. मुंबई- बंगळूर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर वाकड येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

आदम भीमाप्पा (रा. काळखडक, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदम हा शुक्रवारी सकाळी जखमी अवस्थेत मिळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आदम याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murdered of person by stabbing in the neck; Incident in the Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.