आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:30 PM2018-06-26T18:30:25+5:302018-06-26T18:32:43+5:30

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली

The murdered of Alandi Nagar parishad BJP corporator Balaji Kamble | आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून

googlenewsNext
ठळक मुद्दे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज

पिंपरी : आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांना चऱ्होली आळंदी रास्ता येथे हल्लेखोरांनी गाठले. त्यांच्यावर धारधार शास्त्राने वर करण्यात आले. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिघी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Web Title: The murdered of Alandi Nagar parishad BJP corporator Balaji Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.