पूर्ववैमनस्यातून थेरगावात तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 22:46 IST2021-06-07T22:45:51+5:302021-06-07T22:46:28+5:30

मयत पंकज धोत्रे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते .

Murder of a youth in Thergaon from former issue; Both arrested | पूर्ववैमनस्यातून थेरगावात तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; दोघांना अटक

पूर्ववैमनस्यातून थेरगावात तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; दोघांना अटक

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून केला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनीअटक केली. थेरगाव येथे रविवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली. 

पंकज धोत्रे (वय २२, रा. थेरगाव), असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रथमेश शिंदे आणि मंथन सुधाकर चव्हाण (वय २०, रा. थेरगाव), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह एका विधीसंघर्षीत बालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने पंकजचा मृत्यू झाला. पंकज याच्या विरोधातही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a youth in Thergaon from former issue; Both arrested