देहूत तरुणाचा गळा कापून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:39 IST2019-07-05T21:38:24+5:302019-07-05T21:39:11+5:30

देहुमध्ये एका व्यक्तीचा गळा कापून खून करण्यात आला आहे.

murder of yoth in dehu | देहूत तरुणाचा गळा कापून खून

देहूत तरुणाचा गळा कापून खून

देहू : देहूगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पोलिस चौकी लगतच एका ३५ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय ३५, रा. माळवाडी, देहूगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. देहूगाव येथील  इंद्रायणी नदीच्या पुलाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस चौकी लगतच शंकरवर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून गळा कापून खून केला. घटनास्थळावर देहूरोङ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, पोलीस कर्मचाऱ्यांचे पाचारण झाले. घटनास्थळाची पाहणी, पंचनामा करून विच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Web Title: murder of yoth in dehu