किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:17 IST2019-05-03T17:14:50+5:302019-05-03T17:17:02+5:30

किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडी येथील म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली.

murder of person in hinjawadi | किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून

किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून

पिंपरी : किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडी येथील म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली. 

रविंद्र साहू (वय २६, रा. लेबर कॅम्प, म्हाळुंगे, मूळ-झारखंड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविंद्र हा मूळचा झारखंडचा असू तो कामानिमित्त पुण्यात आला होता. म्हाळुंगे चौकाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये रविंद्र राहत होता. गुरुवारी त्याचे त्यांच्या सहकाऱ्यांशी भांडण झाले होते. त्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून रविंद्र याचा खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: murder of person in hinjawadi