Pune Crime: इंद्रायणी नदीच्या काठी डोक्यात शस्त्र मारून खून, देहूगावमध्ये घटना उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:43 IST2023-11-24T11:42:53+5:302023-11-24T11:43:50+5:30
पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली...

Pune Crime: इंद्रायणी नदीच्या काठी डोक्यात शस्त्र मारून खून, देहूगावमध्ये घटना उघडकीस
पिंपरी :इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून खून केला. देहूगाव येथे बुधवारी (दि. २२) पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली.
देवीदास मारुती भराडे (४२, रा. शिवबा चौक, सुसगाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विकास बंडू घुगे (२३, रा. महादेव नगर, सुसगाव, पुणे. मूळ रा. मंगरूळ बुद्रुक, परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) रात्री अकरा ते बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या कालावधीत अज्ञातांनी फिर्यादी विकास घुगे यांचे मामा देवीदास भराडे यांच्या डोक्यात मारहाण करून खून केला. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला.