शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:42 IST

रुग्णालयात करणार विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण

पिंपरी : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर शहरात रुग्णालयात विलगीकरणासाठी रुग्णशय्या आणि अतिदक्षता रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्ण आढळल्यानंतर व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. कोरोना साथीनंतर महापालिकेने भविष्यात संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास रुग्णालयात रुग्णशय्यांची व्यवस्था केली आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयांत विलगीकरणासाठी रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर रुग्ण वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.हे करा :१. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.२. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.३. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.४. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा५. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्या.६. दररोज स्वच्छ धुतलेला रुमाल वापरा. हे करू नये :  १. हस्तांदोलन  २. टिश्यू पेपरचा पुनर्वापर  ३. आजारी लोकांशी जवळचा संपर्क  ४. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.  ५. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.  ६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे. 

महापालिकेच्या हद्दीत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. हा व्हायरस श्वसनसंस्थेला संक्रमित करतो. हा साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे. त्यामध्ये फ्लूसारखी अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणे असतात. यामध्ये सर्दी, खोकला किंवा ताप असू शकतो. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना हा आजार लवकर होऊ शकतो.  - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाdoctorडॉक्टरHealthआरोग्यHMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरस