क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर; मुलांच्या शैक्षणिक वर्षाबाबत पालक आक्रमक

By प्रकाश गायकर | Published: February 16, 2024 06:05 PM2024-02-16T18:05:11+5:302024-02-16T18:08:40+5:30

शाळेच्या संचालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली

Municipal bulldozer on creative academy encroachment Parents are aggressive about their children's academic year | क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर; मुलांच्या शैक्षणिक वर्षाबाबत पालक आक्रमक

क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर; मुलांच्या शैक्षणिक वर्षाबाबत पालक आक्रमक

पिंपरी : शहरातील रावेत कॉर्नर येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख यांने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर या शाळेला मान्यता नाही, तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या बांधकामावर बुलडोजर फिरवत कारवाई केली आहे. त्यामुळे आता शाळा बंद झाली असून पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन गेले आहेत.

निवासी शाळेतील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलींचे समुपदेशन करत गैरप्रकार झाला असेल तर पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर नौशाद शेख याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास करत असताना या निवासी शाळेबाबत अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या.

निवासी शाळेच्या वसतिगृहासाठी समाजकल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, ही परवानगी नसल्याची बाब समोर आली. तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम करत अतिक्रमण केले असल्याचेही महापालिकेने केलेल्या तपासात समोर आले. त्यामुळे या वाढीव बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार, शुक्रवारी (दि. १६) महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकाने या निवासी शाळेवर कारवाई केली. यामध्ये मेस, कार्यालय, वर्गखोल्या तसेच वेटिंग रुमसाठी केलेले वाढीव बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आली असून पालक विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. तसेच आता घरीच अभ्यास करून परीक्षा देणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पालक व मुलांचा विरोध

निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या कारवाईसाठी विरोध केला. आम्ही पूर्ण पैसे भरले आहेत. तसेच आता परीक्षा देखील तोंडावर आहे. अशा परिस्थितीत आम्ही अभ्यास कुठे करायचा असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी व पालकांनी या कारवाईला विरोध केला.

Web Title: Municipal bulldozer on creative academy encroachment Parents are aggressive about their children's academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.