शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

हिंजवडीतील 'त्या' पीडित मुलींच्या कुटुंबियांना खासदार प्रितम मुंडे यांनी दिला धीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 17:17 IST

'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला.

ठळक मुद्देपीडित कुटुंबियांना शासकीय सहाय्य आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार या घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी मुंडे यां दूरध्वनीवरून चर्चा सोशल मीडियामध्ये पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन

पिंपरी : हिंजवडी परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटुंबियांची खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज भेट घेतली व त्यांना धीर दिला. ' ताई, तुमच्या भेटीमुळे आम्हांला खरा आधार मिळाला आहे, आता तुम्हीच आमच्या माय-बाप आहात, अशा शब्दांत पीडितेच्या पित्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने मुंडे यांनी आज हिंजवडी परिसरात राहणा-या 'त्या' पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. 'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. 

यावेळी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, केशव घोळवे आणि रवि खेडकर, दीपक नागरगोजे, आबा नागरगोजे, संतोष राख आदी उपस्थित होते.    

.....................अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आणि पोलिस आयुक्तांशी फोनवर चर्चाया घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी मुंडे यांनी यावेळी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा नये असे त्या म्हणाल्या. ही घटना अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे त्याचे भांडवल करू नका अथवा याबाबत सोशल मीडियामध्ये पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.   

टॅग्स :PuneपुणेPritam Mundeप्रीतम मुंडेhinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीPankaja Mundeपंकजा मुंडे