दागिन्यांबाबत विचारल्याने आईवर चाकू हल्ला; मुलाला ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Updated: February 13, 2024 14:33 IST2024-02-13T14:31:59+5:302024-02-13T14:33:39+5:30

कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने न दिल्याने मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला

Mother stabbed for asking about jewellery Shackles on the child | दागिन्यांबाबत विचारल्याने आईवर चाकू हल्ला; मुलाला ठोकल्या बेड्या

दागिन्यांबाबत विचारल्याने आईवर चाकू हल्ला; मुलाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : घरातील दागिन्यांबाबत विचाराणा केल्याने आईवर मुलाने जिवघेणा हल्ला केला. चाकूने डोक्यावर व हातावर वार करून जखमी केले. थेरगाव येथे रविवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

जखमी महिलेने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून फिर्यादी महिलेच्या १९ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते. ते दागिने दिसून आले नाहीत. त्यामुळे महिलेने त्यांच्या १९ वर्षीय मुलाकडे त्याबाबत विचारणा केली. कपाटातील सोन्याचे दागिने नाहीत. ते कुठे आहेत, तू गहाण ठेवले किंवा विक्री केले काय, असे महिलेने मुलाला विचारले. मी पोलिसांना बोलावते, असेही महिला म्हणाली. त्यावरून मुलाला राग आला. तू जिवंत राहिली तरच पाेलिसांना बोलावशील, असे मुलगा म्हणाला. त्यानंतर त्याने चाकूने महिलेला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने महिलेच्या डाेक्यावर, दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करीत आहेत.

Web Title: Mother stabbed for asking about jewellery Shackles on the child