Pimpri Chinchwad: आईनेच केला आठ महिन्यांच्या बालकाचा खून; चिखलीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:11 IST2023-06-15T18:08:32+5:302023-06-15T18:11:12+5:30
त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला...

Pimpri Chinchwad: आईनेच केला आठ महिन्यांच्या बालकाचा खून; चिखलीतील धक्कादायक घटना
पिंपरी : आईनेच पोटच्या आठ महिन्यांच्या मुलाचा नाक व तोंड दाबून खून केला. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी चिखलीत घडली. या महिलेविरोधात तिच्या पतीने बुधवारी (दि.१४) चिखली पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मंगळवारी कामाला गेले होते. त्यांच्या पत्नीने रागाच्या भरात त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलाचे नाक व तोंड दाबून त्याचा खून केला. त्यानंतर घरातील कटरच्या साहाय्याने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून घरातील बाथरूममध्ये जाऊन आतून कडी लावून घेत स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, यात महिला बचावली आहे.