शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 4:11 PM

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रियेची जबाबदारी : निवडणूक निर्णय अधिकारीपदी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती 

नारायण बडगुजर पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागला आहे. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे.     विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. कर्जतसाठी प्रांताधिकारी वैशाली परदेशी, उरणसाठी दीपा भोसले, चिंचवडसाठी मनीषा कुंभार आणि पिंपरीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली उंटवाल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.शहरातील या तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिलांची नियुक्ती आहे. पुण्यातील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी भोसरी मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. माळी यांनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध जबाबदाºया पार पाडल्या आहेत. फलटणला प्रांताधिकारी म्हणून, तसेच विविध निवडणुकांसाठीही प्रमुख पदांवर काम केले आहे. चिंचवडच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार २००९च्या उपजिल्हाधिकारी आहेत. सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या प्रांताधिकारी आदी पदांवर त्यांनी सक्षमपणे काम केले आहे. सध्या त्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.पिंपरीच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल यांनी सहा वर्षे विक्रीकर विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे. निवडणुकीचे कामकाज आणि भोरच्या प्रांताधिकारी पदासह सांगली, सातारा जिल्ह्यांतही विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

नोडल अधिकारीपदीही महिलापुणे जिल्हा उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोनिका सिंह यांच्याकडे जबाबदारी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीशी संबंधित विविध प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नोडल अधिकारी म्हणून पल्लवी सोनवणे, प्रज्ञा वाळके, गौरी पवार, यांचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधिका हावळ, तसेच अन्य विविध पदांसाठीही महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :mavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिला