सोशल मीडियाद्वारे वॉच ठेवत धमकी देऊन महिलेचा विनयभंग; वाकड येथे गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:46 PM2021-03-09T13:46:31+5:302021-03-09T13:47:27+5:30

'रिलेशन' ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेला शिवीगाळ

Molestation of a women by watch through social media; a crime registred at Wakad | सोशल मीडियाद्वारे वॉच ठेवत धमकी देऊन महिलेचा विनयभंग; वाकड येथे गुन्हा दाखल

सोशल मीडियाद्वारे वॉच ठेवत धमकी देऊन महिलेचा विनयभंग; वाकड येथे गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : महिला व तिच्या पतीवर सोशल मीडियाद्वारे पाळत ठेवून पर्सनल फोटो पतीला व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. 'रिलेशन' ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिला व तिच्या पतीला जगू देणार नाही, अशीही धमकी देऊन विनयभंग केला.

रोहन राजेंद्र वहीले (वय २५, रा. देहूरोड), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एप्रिल २०२० ते ८ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी महिला व तिच्या पतीवर सोशल मीडियाद्वारे पाळत ठेवली. तसेच फिर्यादीला वारंवार फोन केला. तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर तुझे व माझे पर्सनल फोटो तुझ्या नवऱ्याला व नातेवाईकांना पाठवेन, अशी धमकी दिली. तू मला आवडतेस, तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे ये, मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचे आहे. मला तुझ्याशिवाय करमत नाही, असे म्हणाला व फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे बोलला. फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने फोनवरून शिवीगाळ केली.  तुला व तुझ्या नवऱ्याला जगू देणार नाही, अशी धमकी दिली. 

Web Title: Molestation of a women by watch through social media; a crime registred at Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.