नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 11:25 IST2019-12-22T11:24:34+5:302019-12-22T11:25:40+5:30

महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्याच्या विराेधात वाकड पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

molestation of women in wakad | नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन केला विनयभंग

नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन केला विनयभंग

पिंपरी : महिलेचा गुपचूप पाठलाग केला. तसेच प्रेमसंबंध ठेवायचे आहेत, असे सांगून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. तसेच तुझे अश्लील फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठवून जिवे ठार मारीन, अशी धमकी दिली. थेरगाव येथे बुधवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 28 वर्षीय पीडितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष पांडे (वय 32, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पांडे यांचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवण्याची त्यांच्याकडे मागणी केली. तसेच त्यांचे पती, सासू व इतर नातेवाईकांना अश्लील फोटो पाठविण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: molestation of women in wakad