तरुणाकडून दोन बहिणींचा विनयभंग ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:20 IST2019-08-05T21:20:02+5:302019-08-05T21:20:30+5:30

पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा तसेच तिच्या बहिणीचा विनयभंग केला. मोरवाडीतील लालटोपीनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Molestation of two young sister by young boy | तरुणाकडून दोन बहिणींचा विनयभंग ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तरुणाकडून दोन बहिणींचा विनयभंग ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा तसेच तिच्या बहिणीचा विनयभंग केला. मोरवाडीतील लालटोपीनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल अशोक वाघमारे (वय २२, रा. लालटोपीनगर झोपडपट्टी, मोरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. दि. २० फेब्रुवारी ते शनिवार, दि. ३ आॅगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी वाघमारे याने फिर्यादी मुलीचा वेळोवेळी पाठलाग केला. शनिवारीही असाचा पाठलाग करून फिर्यादीचा विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादी मुलीने आरडाओरडा केला. त्यावेळी मुलीची बहीण तेथे आली असता मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून आरोपी वाघमारे याने तिचाही विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Molestation of two young sister by young boy